सासवडचाही लाॅकडाऊन वाढला; तालुक्यात २१३वर पोहोचली रुग्णांची संख्या

Lockdown increased in Saswad Pune District
Lockdown increased in Saswad Pune District

सासवड : सासवडमधून पुण्यात जाणारे-येणारे अधिक असल्याने कोरोनाचा विळखा वाढतोय. पुरंदर तालुक्यात आज (ता. १२) तब्बल १७ रुग्ण कोरोना पाॅझीटिव्ह निष्पन्न झाले आहेत. त्यातून आज तालुका द्विशतक पार करून २१३ वर पोचला. तालुक्यातील कोरोनाबाधीत गावे २९वर पोचून ग्रामीणमध्येही धाकधूक वाढली आहे. सासवडमध्ये आज १०ने रुग्ण वाढून एकुण रुग्णसंख्या १२६ झाली आहे. सासवडला एका रुग्णालयात कोरोनायोध्दाच पाॅजिटिव्ह सापडल्याने यंत्रणेची धावपळ वाढली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, आमदार संजय जगताप व मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सासवड शहरातील लाॅकडाऊन शिथील न करता मंगळवार (ता. 14) पर्यंत सुरु राहिल असे जाहीर केले. त्यातून बाजारपेठ बंदच आहे. शहरातील कॅन्टॉन्मेंट झोनमधील लांडगे गल्लीत प्रत्येकाची कोरोना पार्श्वभूमीवर २३ प्रकारची वैद्यकीय तपासणी सुरु होईल. त्यातून स्वॅब कोणाचे घेणे गरजेचे आहे ते समजेल असेही आमदार जगताप यांनी यानिमित्त सांगितले.
---------------
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतायेत; आता घराबाहेर पडा
---------------
काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 
---------------
दरम्यान, आज सासवडसह सोनोरी, उदाचीवाडी, परिंचे, तोंडल गावात रुग्ण वाढले  आहेत. त्यातून तालुक्यात २९ गावात कोरोनाचा शिरकाव होताना २५वरुन ४०च्या पुढे कॅटॉन्मेंट झोन गेले आहेत. सासवडला आज जे पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्यात रुग्णालयातील एक कोरोना योध्दा व इतरत्रची तीन अल्पवयीन मुले आहेत. सासवडचा लाॅकडाऊन शिथील करण्याबाबत रुग्ण संख्या पाहूनच सोमवारी ता. १३ दुपारी बैठकीत ठरविले जाईल, असे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

.. तरच नियंत्रण 
पुरंदर तालुक्यात रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कॅन्टॉन्मेंट झोन केले जातात. पण, आवश्यक ती काळजी घेऊन नियम लोकांकडून पाळले जात नाहीत. प्रशासनामार्फत त्यावर अपेक्षित लक्ष नसल्याने तिथेच वारंवार रुग्ण आढळून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com