विनाकारण फिरणाऱ्यांनो सुधरा...

corona logo
corona logo

महर्षीनगर : कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी शहरातील सील केलेल्या भागांत नागरिक अजूनही विनाकारण बाहेर पडताना दिसतात. डायस प्लॉट, मीनाताई ठाकरे वसाहत, इंदिरानगर झोपडपट्टी भागातील तरूण एकत्रित जमून गप्पा मारत आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती देखील यांना राहिली नसल्याचे चित्र या भागांत दिसत आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील पूर्व भागातील महर्षीनगर, मुकुंदनगर, डायस प्लॉट, गुलटेकडी आदी भाग सील केले आहेत. मात्र, अजूनही डायस प्लॉट, मीनाताई ठाकरे वसाहत, इंदिरानगर झोपडपट्टी भागातील तरूण विनाकारण बाहेर पडत आहेत.

डायस प्लॉटच्या पुलाखाली, रिक्षात, तसेच दुचाकीच्या पार्कींगमध्ये बसून गप्पा मारल्या जात आहेत. या भागात पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून हे सर्व प्रकार सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी तरूणांना पोलीसांकडून चांगला चोप दिला जातोय. महर्षीनगर, मुकुंदनगर भागात नागरिक पोलिसांना सहकार्य करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com