पुणे जिल्ह्यात असा असणार लॉकडाऊन, प्रशासनाने जाहीर केली नियमावली

अनिल सावळे
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे जिल्ह्यात 14 ते 29 पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार याबाबतची नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

पुणे, ता.  13 :  जिल्ह्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊन जाहीर केलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस आयुक्त आणि पुणे, देहूरोड व खडकी छावणी परिषद यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात काढलेल्या आदेशानुसार लॉकडाऊनचे आदेश लागू राहतील. 14 ते 19 जुलैपर्यंत हे आदेश लागू राहतील. त्यानंतर नियमात काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल.

हे बंद राहील: 
(14 जुलैपासून 19 जुलैपर्यंत)
 - सर्व किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेते
- ऑनलाईन पोर्टलवरुन खाद्यपदार्थ पुरवठा 
- सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, उद्याने  
उपहारगृह, बार, लॉज
- धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे 
- हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार 
- केश कर्तनालय, स्पा, ब्यूटी पार्लर
- शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग 
- सार्वजनिक, खासगी प्रवासी वाहने, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी.

पाहा Video : 'पुणेकरांनो, लॉकडाउनचे नियम मोडू नका, नाहीतर...'; पोलिसांनी काय दिलाय इशारा?

अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाण्याकरिता आणि वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहनांना परवानगी असेल.

सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षागृह, सभागृह, मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभास बंदी. मात्र, यापूर्वी परवानगी घेतलेला लग्न समारंभ 20 पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित करता येईल.

हे वाचा - लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार; नाक मुरडत पुणे व्यापारी महासंघ राजी!​

ग्रामपंचायत क्षेत्रात काय?
प्रतिबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर बंदी. सर्व प्रकारचे बांधकामे बंद राहतील. तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल.

हे सुरू राहील : 

-दूध विक्री, घरपोच दुधाचे वितरण, वैद्यकीय सेवा, मेडीकल दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण 
- न्यायालय, केंद्र व राज्य सरकारी कार्यालये 10 टक्के कर्मचारी वर्गासह सुरु राहतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय.
- पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील. केवळ सरकारी, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन पुरवठा
- दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था, डिजीटल, प्रिंट मीडिया यांची कार्यालये सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण सकाळी 8 ते 9 या वेळेत परवानगी राहील.
- बँका, ऑनलाईन, एटीएम सेवा, पाणीपुरवठा टॅंकर,
- शेतीविषयक कामे, बी-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता कामगार, अग्निशमन सेवा.

हे वाचा - दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण?

उद्योग, एमआयडीसीत वाहनांना परवानगी

उद्योग, एमआयडीसी क्षेत्रात जाण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांना आणि निश्चित केलेल्या बसमधून प्रवासाला परवानगी राहील. ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायती :
हवेली तालुका : 

वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोर्हे बुद्रुक आणि खुर्द, डोणजे, खानापुर, थेऊर.
मुळशी तालुका : 
नांदे, भुगाव, भुकुम, पिरंगुट, घोटावडे, हिंजवडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown pune know rule what open and close