लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांची जमली विज्ञानाशी गट्टी

कोथरूड - वैज्ञानिक प्रयोग करण्यात दंग असलेले विद्यार्थी.
कोथरूड - वैज्ञानिक प्रयोग करण्यात दंग असलेले विद्यार्थी.

कोथरूड - विज्ञान हे आपल्या अवतीभोवती आहे. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. हेच तत्त्व डोळ्यासमोर ठेवून माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळाच्या माहेश्वरी विद्यालयात ‘विज्ञान आपल्या घरी’ हा उपक्रम राबविण्यात आला. लॉकडाउन काळात आलेल्या निर्बंधांवर मात करत मुलांसोबतच्या शैक्षणिक प्रक्रियेत खंड पडू नये म्हणून मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनी सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन मुलांमधील वैज्ञानिक दृष्टी वाढावी म्हणून विविध प्रयोग केले. मुख्याध्यापिका अजोतीकर म्हणाल्या की, लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु झाले. घरी असलेल्या मुलांमधील शैक्षणिक प्रेरणा टिकून राहावी, वाढावी यासाठी आम्ही विविध शैक्षणिक प्रयोग केले. त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी घरच्या घरी काही प्रयोग केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी अडचणींवर मात करून साधलेल्या संवादातून हे घडू शकले. इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. रुद्र कदम (घरांचे प्रकार), अरोही येळवंडे (चांगल्या सवयी), श्रावणी पवार (आपले मदतनीस) ओवी सूर्यवंशी (शरीराचे अवयव), श्रेयस फपाळ (पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ), सोहम कदम (पाण्याचे गुणधर्म), संस्कार शेळके (पाण्यावर तरंगणाऱ्या आणि बुडणाऱ्या वस्तू), रिद्धी निकटे (अन्न साखळी), ऐनेश तापीकर (बुरशीची वाढ), देवांग पवार (आम्ले आणि अल्कली ओळखणे), वेदांत कुलकर्णी (ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो), शर्वरी डाफळे (जलचक्र), भाग्यश्री पवार (ज्वालामुखी) पूर्वा मरे (ऊर्जेचे रूपांतर) असे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रयोग केले.

माझ्या मुलीने घरातील वस्तू वापरून, घरालाच प्रयोगशाळा बनवली. यामध्ये एखादी वस्तू नाही म्हणून आडून न बसता पर्यायी कोणती वस्तू वापरता येईल, याचा चलाखपणे विचार करत अडचणीवर मात करत आपला प्रयोग सादर केला.
- अनिता मारणे, पालक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com