Coronavirus : लोहगाव विमानतळावर शांतता; रिक्षा, टॅक्‍सी, कॅबसेवेला फटका

Microgo
Microgo

कोरोनामुळे पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्याचा फटका विमान कंपन्यांना बसत असून, गजबजलेल्या लोहगाव विमानतळावरही शांतता निर्माण झाली आहे. परिणामी रिक्षा, टॅक्‍सी, कॅबसेवेलाही त्याचा फटका बसला आहे. 

लोहगाव विमानतळावरून दररोज सुमारे १७० विमानांची उड्डाणे होतात. सुमारे ३० हजार प्रवासी ये-जा करतात. मात्र, कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत २७ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. पुण्यावरून दिल्लीसाठी १६ उड्डाणे होतात. त्यापाठोपाठ बंगळूर, हैदराबादसाठी उड्डाणे होतात. मात्र, दहा दिवसांपासून उड्डाणे रद्द झाली नसली तरी, प्रवासी संख्येत घट झाली आहे. पुणे-दुबई मार्गावरील विमान वाहतूक एअर इंडिया १८ मार्चपासून तूर्त स्थगित ठेवणार आहे. 

विमानतळावर खबरदारी  
विमानतळाच्या आवारात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याअंतर्गत दिवसातून तीन वेळा विमानतळावर निर्जंतुकीकरण करण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com