Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

2500 Page Chargesheet : लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पूर्ण केला आहे. पोलिसांनी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तब्बल २५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
Ketan Agrawal Murder Investigation

Ketan Agrawal Murder Investigation

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणाला आता महत्त्वाचे कायदेशीर वळण मिळाले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून तब्बल २५०० पानांचे दोषारोपपत्र वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केले आहे. भावी पत्नी सिया गोयल हिने साथीदार चेतन चौधरीच्या मदतीने केतनची दरीत ढकलून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी तपासातून व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com