लोणी काळभोर, लोणीकंद पोलिस ठाण्यांचा अखेर पुणे शहर आयुक्तालयामध्ये समावेश

 लोणी काळभोर, लोणीकंद पोलिस ठाण्यांचा अखेर पुणे शहर आयुक्तालयामध्ये समावेश
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : महाराष्ट्र दिनी होणार... पुढील महिण्यात होणार.. आठ दिवसात होणार... या संवादाने मागील दोन ते अडीच वर्षांपासून गाजत असलेल्या लोणी काळभोर व लोणी कंद या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश अखेर सोमवारी (ता. २२) मध्यरात्रीपासून पुणे शहर आयुक्तालयात झाला आहे. पुणे शहर आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री बारापासून लोणी काळभोर व लोणी कंद या दोन पोलिस ठाण्यांचा कारभार हाती घेतला आहे. यास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनीही दुजोरा दिला आहे.

दरम्यान लोणी काळभोर व लोणी कंद या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश शहर पोलिसांत होणार असल्याच्या चर्चेबरोबरच उरुळी कांचन व परीसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र लोणी काळभोर बरोबरच उरुळी कांचनचा समावेशही शहर पोलिसांत झाल्याने, स्वतंत्र उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या आश्वासनाला मात्र राज्य सरकारकडून कात्रजचा घाट दाखवल्याचे स्पष्ठ झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या अखत्यारीत असणारी लोणीकंद व लोणी काळभोर या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात होणार असल्याच्या चर्चा मागील दोन ते अडीच वर्षांपासून चालु होत्या. पोलिस खात्यामधील वरीष्ठ अधिकारांच्या बरोबरच राजकीय लोकांच्याकडून ठामठोकपणे तारखा मिळत होत्या. मात्र प्रत्यक्ष वेळ मात्र येत नव्हती. यामुळे पोलिस खात्याबरोबरच, सर्वसामान्य नागरीकांचेही वरील दोन्ही पोलिस ठाण्यांच्या शहर पोलिसांत होणाऱ्या समावेशाकडे लक्ष होते. अखेर सोमवारी रात्री बाराच्या सुमारास मुहुर्त मिळाला. 

दरम्यान राज्य सरकारने मंगळवारी (ता. १६ मार्च) वरील दोन्ही पोलिस ठाण्यांच्या समावेशासाठी लेखी स्वरुपात परवानगी दिली होती. या परवानगीमुळे १८ मार्चपुर्वीच लोणी काळभोर व लोणी कंद पोलिस ठाणे यांचा ताबा शहर पोलिसांकडे जाणार होता. मात्र कांही शासकीय कामकाजामुळे वरील दोन्ही पोलिस ठाणी शहर पोलिस दलामध्ये समाविष्ट होण्यासाठी विलंब  लागला होता. अखेर सोमवारी मध्यरात्री पासून लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाण्याचा कारभार पुणे शहर आयुक्तालयामार्फत सुरु झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, ''पुणे शहर पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री बाराच्या सुमारास लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही पोलिस ठाण्यांचा कारभार हाती घेतला आहे. यामुळे अधिकृतरित्या वरील दोन्ही पोलिस ठाण्यांचा समावेश शहर पोलिसांत झाला आहे. शहर पोलिस दलातील वरीष्ठ अधिकारी मंगळवारी सकाळी वरील दोन्ही पोलिस ठाण्यात भेट देऊन, कामकाजाचा आढावा घेणार आहेत. 

उरुळीच्या नागरीकांमध्ये मोठा असंतोष- लोणी काळभोर पोलिस ठाणे शहर पोलिसांत सामाविष्ठ होणार असल्याच्या चर्चेबरोबरच उरुळी कांचन व परीसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण होणार असल्याच्या चर्चाही जोरात चालु होत्या. आमदार अशोक पवार यांनीही वाघोली व उरुळी कांचनसाठी दोन स्वंतत्र पोलिस ठाणी व्हावीत यासाठी शासन दरबारी जोर लावला होता. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठकही झाली होती. यामुळे उरुळी कांचनमधील राजकीय नेते व नागरीक खुश होते. मात्र सोमवारी रात्री लोणी काळभोर बरोबरच उरुळी कांचनचाही समावेश शहर पोलिसांत केला गेल्याने, उरुळी कांचन परीसरात संतापाची लाट पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार हे दोघेही स्वतंत्र उरुळी कांचन पोलिस ठाण्यासाठी आग्रही असताना, आदेशात मात्र उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या आश्वासनाला कात्रजचा घाट दाखवला गेल्याचे स्पष्ठ झाले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com