Crime News : लोणीकंद परिसरात जमिनीवरून दोन गटांत वाद; एकमेकांवर रोखले पिस्तूल

लोणीकंद परिसरातील कोलवडी गावात जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण करून एकमेकांवर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला.
Crime
Crimesakal

पुणे - लोणीकंद परिसरातील कोलवडी गावात जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण करून एकमेकांवर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवेली तालुक्यातील कोलवडी गावात गुरुवारी (ता. १) जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण, धक्काबुक्कीचा प्रकार घडला. याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधात तक्रार दिली आहे. चंद्रकांत महादेव कुंजीर (वय ५१, रा. हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या शेतात कुटुंबासमवेत गेले होते.

त्यावेळी सहा ते सात जणांनी त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करून शेतातून बाहेर जाण्यास सांगितले. शेतातून बाहेर न गेल्यास रक्त सांडेल, अशी धमकी देत योगेश शिंत्रे याने पिस्तूल रोखले. या फिर्यादीवरून अविनाश बापूसाहेब सातव, तुषार राजाराम म्हस्के, योगेश अशोक शिंत्रे, नवनाथ तुकाराम घुले, एकनाथ पिराजी उंद्रे यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, योगेश शिंत्रे (वय-३३, रा. चंदननगर, खराडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी सहा जणांसमवेत भागीदारीत कोलवडी येथील शेतजमिनीत काही जागा खरेदी केली आहे. ती जागा विकसित करून प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे.

त्यावेळी चंद्रकांत कुंजीर यांच्यासह सातजणांनी त्यांना याठिकाणी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, या वेळी अन्य एकाने कमरेचे पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून चंद्रकांत कुंजीरसह सातजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत प्राप्त झालेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील काम थांबवून पंचनामा करण्याचे आदेश लोणीकंद पोलिसांना दिले आहेत.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com