पुणे : ... अन् पोलिसांच्या मदतीने महिलांनी रोखला बालविवाह!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

मुलगी बीडमधील शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती, अशी माहिती मिळाली असून आता तिला एका सामाजिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

वाघोली : विद्येचं माहेरघर आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या सारख्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची भूमी अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र, याला गालबोट लागेल असे अनेक प्रकार शहरात वारंवार घडत असतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नुकताच वाघोली परिसरातील बुरकेगाव (ता.हवेली) येथे होणारा बालविवाह अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वुमन हेल्पलाईन फाउंडेशनच्या महिलांनी रोखला. या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Budget 2020 : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'ला प्रचंड प्रतिसाद

मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील 15 वर्षीय मुलीचा विवाह बुरकेगावमधील एका 24 वर्षीय मुलासोबत शुक्रवारी (ता.31) होणार होता. याबाबतची वार्ता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांना कळाली. आणि त्यांनी वुमन हेल्पलाईन फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांना याप्रकरणाची कल्पना दिली.

- #AusOpen : मुगुरुझाला हरवत 21 वर्षीय केनिन बनली नवी टेनिस क्वीन!

त्यानंतर परदेशी यांनी मोनिका पिसाळ, संकल्प वाघमारे, कृष्णा कुंदनांनी, स्वाती कदम यांच्यासह आळंदी येथे संबंधितांचा शोध घेतला. मात्र, हा विवाह बुरकेगाव येथे होणार असल्याची माहिती कळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.

- Budget 2020 : '... तरंच माझ्यासारखा कार्यकर्ता अर्थसंकल्पाचं स्वागत करेल' : रोहित पवार

लोणीकंद पोलीस स्टेशनमधील पोलिस कर्मचारी आणि परदेशी बुरकेगावमध्ये दाखल झाले. आणि त्यांनी नियोजित विवाह रोखला. यानंतर परदेशी यांनी या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी मुलगा, त्याचे आईवडील, नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी बीडमधील शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती, अशी माहिती मिळाली असून आता तिला एका सामाजिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonikand Police and initiative woman group stop child marriage at Wagholi