esakal | Budget 2020 : '... तरंच माझ्यासारखा कार्यकर्ता अर्थसंकल्पाचं स्वागत करेल' : रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit_Pawar

शनिवारी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सोळा कलमी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना ऊर्जासमृद्ध करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे जाहीर करण्यात आले.

Budget 2020 : '... तरंच माझ्यासारखा कार्यकर्ता अर्थसंकल्पाचं स्वागत करेल' : रोहित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अर्थसंकल्प 2020 : पिंपरी-चिंचवड : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (ता.1) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, त्यांनी सांगितलेला 15 लाख कोटींच्या रकमेचा आकडा खोलात जाऊन बघावा लागेल. कारण सकाळपासून मी कामात असल्याने मी बजेट बघितलेले नाही. अर्थमंत्र्यांनी सांगितलेला तो आकडा नक्की खरा आहे काय?'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

- Budget 2020 : मुंबईला पर्यायी शहर काढण्याचा मोदींचा प्रयत्न : जयंत पाटील

ते पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पात जाहीर केलेला आकड्याबाबत शहानिशा केली जाईल. कारण आकड्यांसोबत कसं खेळायचं हे भाजप सरकारला चांगलं ठाऊक आहे. जाहीर केलेली मदत खरंच सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाईल, याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारवेळी इंटरेस्ट पोर्शन वेगळ्या बजेटमध्ये धरला जात होता. पण भाजप सरकारने काही गोष्टी क्लब करत बजेट वाढवल्याचे भासवले होते. त्यामुळे याबाबत नेमके काय आहे? हे बघावं लागेल. अशी प्रतिक्रिया आमदार पवार यांनी दिली. 

- Budget 2020 : अर्थसंकल्प सादर अन् शेअर बाजारात मोठी घसरण!

शेतकऱ्यांबाबत आमदार पवार म्हणाले की, ''बजेटमध्ये जाहीर केलेला आकडा मी पाहिला नाही. पण त्यामध्ये जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली असेल. आणि जर बजेटमध्ये जाहीर केलेली मदत छोट्या शेतकऱ्यांच्या हातात जाणार असेल, तर माझ्यासारखा कार्यकर्ता याचं नक्की स्वागत करेल.''

- #AusOpen : मुगुरुझाला हरवत 21 वर्षीय केनिन बनली नवी टेनिस क्वीन!

शनिवारी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सोळा कलमी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना ऊर्जासमृद्ध करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे जाहीर करण्यात आले. केंद्र सरकारच्या मॉडेलचं अनुकरण करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कुसूम योजना फायदेशीर ठरेल, अशा विविध योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्या आहेत.