esakal | #AusOpen : मुगुरुझाला हरवत 21 वर्षीय केनिन बनली नवी टेनिस क्वीन!

बोलून बातमी शोधा

Australian_Open_2020-Kenin

जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेली सोफिया पहिल्यांदाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत होती.

#AusOpen : मुगुरुझाला हरवत 21 वर्षीय केनिन बनली नवी टेनिस क्वीन!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Australian Open 2020 : मेलबर्न : अमेरिकेच्या 21 वर्षीय सोफिया केनिनने दोनवेळा ग्रॅंडस्लॅम विजेती असलेल्या स्पेनच्या गार्बिन मुगुरूझा हिचा पराभव केला. आणि कारकिर्दीतील पहिली ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धा जिंकली. सोफियाने केवळ दोन तासांत गार्बिनचा 4-6, 6-2, 6-2 असा पराभव केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विजयासह ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ती अमेरिकेची सर्वांत लहान महिला ठरली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या सेरेना व्हिल्यम्सने 2002मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. 

- U19WorldCup: पुन्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने

सोफियाने पहिला गमावूनही सामन्यात पुनरागमन केले. गार्बिनने तिला पहिल्या सेटमध्ये 6-4 असे पराभूत केले. मात्र, त्यानंतर आक्रमक खेळ करत तिने पुढील दोन्ही सेट जिंकत विजेतेपद पटकाविले.

- INDvsNZ : 'सुपर ओव्हर'वर बंदी घाला; क्रीडामंत्र्यांची मागणी

जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेली सोफिया पहिल्यांदाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत होती. उपविजेत्या गार्बिनने यापूर्वी 2016मध्ये फ्रेंच ओपन आणि यापूर्वी 2017मध्ये विंबल्डन स्पर्धा जिंकली आहे.

- INDvsNZ : भावूक झालेल्या मोहम्मद शमीचा मुलीला स्पेशल मेसेज!