परतीच्या पाऊस पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मुळावर

राजकुमार थोरात
Wednesday, 14 October 2020

इंदापूर तालुक्यामध्ये आज (बुधवार) सकाळपासुन परतीच्या पाऊस जोरदार सुरु असून शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसत आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये आज (बुधवार) सकाळपासुन परतीच्या पाऊस जोरदार सुरु असून शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसत आहे. यामध्ये सर्वाधिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

गतवर्षी ही इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. चालू वर्षीही परतीच्या पावसाने जोर धरला आहे.

आज बुधवारी(ता.१४) रोजी सकाळपासुन परतीच्या पावसाने जोरदार सुरवात केली. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा बसणार असून शेतकऱ्यांचा कोट्यावधी ररुपयांचा तोटा होणार आहे. परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे बहुतांश द्राक्षांच्या झाडांच्या मुळ्या खराब झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असून रोगाला बळी पडत आहेत.

‘अहो, मास्क घाला, गळ्यात कशाला अडकवलाय? पीएमपी कंडक्टरांची वाढली डोकेदुखी

नुकत्याचा छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे फुटवे फुटण्यास अडचण येत असून गेल्या एक-दीड महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्ष बागेवरती डावणी व भुरीचा रोगाचा प्रार्दूभाव वाढणार आहे. तसेच द्राक्षांच्या पानामध्ये पाणी साचून कोवळे द्राक्षाचे घड जाग्यावरतीच जिरुन जावू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाची धास्ती घेतली बसून द्राक्ष बागा छाटणी लांबणीवर टाकली आहे.

यासंदर्भात बोरीमधील शेतकरी मल्हारी शिंदे यांनी सांगितले की, पावसामुळे ४० एकर द्राक्षाच्या बागेपैकी  १५ एकर द्राक्ष बागेची छाटणी केली आहे. सलग सुरु असलेल्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावरती करपा, घड जिरणे, पोग्यातील डावणी रोगाचा प्रार्दूभाव होत असून औषधफवारणी करुन द्राक्ष बाग वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. द्राक्ष बागेबरोबरच इतर पिकांनाही परतीच्या पावसाचा फटका बसला असून डाळिंबवरती रोग वाढले आहेत.तसेच कडवळ,मका व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही पावसाने तोटा केला आहे.

पुण्यात कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने असे केले नियोजन

इंदापूर तालुक्यामध्ये दुप्पट पावसाची नोंद...
गतवर्षीच्या तुलनेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत दुप्पट पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत सरासरी सुमारे ८४० मि.मी पाऊस पडला आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of grape growers due to return rains