मार्गशीर्षमधील पहिल्याच गुरुवारी फुल उत्पादकांवरती 'लक्ष्मी' रुसली

मार्गशीर्षमधील पहिल्याच गुरुवारी फुल उत्पादकांवरती 'लक्ष्मी' रुसली

माळशिरस : मार्गशीर्ष महिना व विशेषत: या महिन्यातील गुरुवार हा फुल उत्पादकांसाठी महत्त्वाचा सिझन मानला जातो. यामुळे या महिन्यात श्रद्धेने घरोघरी बसणाऱ्या लक्ष्मी फुल उत्पादकांना पावतात. मात्र आज पहिल्याच गुरुवारी मोठ्या प्रमाणाव कोसळलेल्या फुलांचे बाजार पाहता फुल उत्पादकांवरती लक्ष्मी रुसल्याचे चित्र दिसले.

फुल उत्पादकांसाठी गणपती दसरा व दिवाळी यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीपूजन महत्वाचा धार्मिक विधी असतो. दर गुरूवारी घरोघरी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी होते. त्यामुळे दरवर्षी या महिन्यात फुलांचे बाजारभाव चांगल्या प्रकारे वाढतात. 

यंदादेखील फुल उत्पादकांना मागील अतिवृष्टीमुळे फुलांचे फड मोठ्या प्रमाणावर ती गेल्याने यंदाचा मार्गशीषचा हंगाम हा चांगला जाईल व लक्ष्मी आपल्याला नक्की पावणार अशी मोठ्या प्रमाणावर ती आशा होती. मात्र पहिल्या गुरुवारी फुल बाजारातील चित्र पाहता 'लक्ष्मी' फुल उत्पादकांवरती रुसली कि काय असे असे चित्र पाहावयास मिळाले.

पुणे येथील फूल बाजारात आज झेंडूचे बाजार भाव अत्यंत मातीमोल झाले. पाच ते दहा रुपये किलोने झेंडूची आज विक्री झाली. कापरी फुलांची देखील त्याच प्रकारे पाच दहा रुपये किलोने विक्री झाल्याचे पाहावयास मिळाले. बिजली फुलांचे बाजारभाव 30 ते 50 रुपयांपर्यंत व गुलछडी देखील 30 ते 50 रुपये किलोपर्यंत विकली गेली. अपवादात्मक पौर्णिमा शेवंती पन्नास ते पंच्याहत्तर रुपये वगळता फुलबाजारात सर्व फुलांचे बाजार भाव मागील एक महिन्याचा विचार करता मोठ्या प्रमाणावरती आज कोसळले. यामुळे फुल  उत्पादकां नाराज झाले. 

कोरोनाचा फुल विक्रीवरती परिणाम-मागील काही महिन्यांपासून आलेल्या कोरोणाच्या संकटामुळे अद्यापही फुलबाजारात अनेक मोठे व्यापारी फुले घेण्यासाठी येण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे विक्रेते  मोहन कुंजीर यांनी सांगितले. तर सर्वसामान्य गिऱ्हाईक देखील पहिल्याप्रमाणे अद्यापही फुले खरेदीसाठी येत नसल्याचे विक्रेते पप्पू जराड यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com