esakal | चक्क इमारतींवरून रस्ता
sakal

बोलून बातमी शोधा

PMRDA

चक्क इमारतींवरून रस्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : काही भागांत अस्तित्वात असलेल्या इमारतींवर, तर काही भागांत बांधकाम परवाना मंजूर होऊन इमारत उभारण्याचे काम सुरू आहे, अशा इमारतींवर ‘पीएमआरडीए’च्या प्रारूप विकास आराखड्यात रस्ते दर्शविण्यात आले आहेत. यावरून विकास आराखडा तयार करताना स्वतःच्या दिलेल्या बांधकाम परवानग्या ‘पीएमआरडीए’ने विचारात घेतल्या नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: भाजप सूडाचे राजकारण करत आहे : विजय वट्टेडीवार

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला आहे. या आराखड्यात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हद्दीतील सर्व भागांत चुकीच्या ठिकाणी रस्ते दर्शविण्यात आले आहेत. भूकंप, शेवाळवाडी, सूस, मांजरी, माण, तळेगाव दाभाडे, बकोरी, वाघोली, केसनंद, चांदे, नांदेसह अनेक भागात यापूर्वीच ‘पीएमआरडीए’ने बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्या ठिकाणी इमारती उभ्या असून नागरिक राहत आहेत. असे इमारतींवर रस्ते दर्शविण्यात आले आहे. तर काही ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा: पुणे: पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट

प्रत्यक्षात बांधकाम सुरू होऊन दोन ते तीन मजल्यांचेदेखील झाले आहे. अशा इमारतींवरदेखील रस्ते दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे जागामालक अडचणीत आले आहेत, तर पौडच्या पुढील भागात असलेल्या मुकेवाडी भागात एकही रस्ता दर्शविण्यात आलेला नाही, अशाही काही त्रुटी राहिल्या असल्याचे समोर आले आहे.

वास्तविक, विकास आराखडा तयार करताना यापूर्वी दिलेल्या बांधकाम परवानग्या विचारात घेऊनच रस्ते अथवा अन्य आरक्षणांचा विचार झाला पाहिजे. परंतु ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यात मात्र नेमके यांच्या उलट झाले आहे. हद्दीत अस्तित्वात असलेल्या अनेक भागातील सोसायट्यांवर अशा प्रकारे रस्ते दर्शविण्यात आल्याने ते विकसित होणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: ऐकावं ते नवलचं! दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मोबाईल पळविला

हरकती-सूचनांमध्ये दखल घेणार?

प्रारूप विकास आराखड्यात नांदोशीच्या भागात जशा टेकड्या पुढे सरकरल्या आहेत, तसेच काही भागांत निवासी भाग टेकड्यांवर गेला असल्याचा प्रकारही समोर आला आहे. गुजर निंबाळकरवाडी येथील गट नंबर १० हा निवासी भाग होता, तसेच मुकाईवाडी येथील निवासी भाग असताना तो टेकड्यांवर दर्शविण्यात आला आहे, असेही काही प्रकार प्रारूप आराखड्यात झाले आहे. त्यामुळे हरकती-सूचनांमध्ये याची दखल घेतली जाणार का, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.

"सूसमधील सर्व्हे नंबर चारमधून प्रारूप आराखड्यात रस्ता दर्शविण्यात आला आहे. त्या जागेवर पूर्वीपासूनच बंगले आहेत. असे असताना त्यावरून रस्ता कसा दर्शविण्यात आला?"

- विजय कुलकर्णी, रहिवासी

loading image
go to top