मोबाईलमुळे सुरु झालेल्या प्रेम प्रकरणाची अखेर देखील मोबाईलमुळेच

नागपुर महाराष्ट्राचा मुलगा व आग्रा उत्तर प्रदेशची मुलगी या सोशल मिडीया मधुन प्रेम जमलेल्या युगुलाचा आग्र्यावरुन पळुन येऊन भोर तालुक्यातील भिलारेवाडी येथे आसरा घेतला.
Lovers Arrested
Lovers ArrestedSakal
Summary

नागपुर महाराष्ट्राचा मुलगा व आग्रा उत्तर प्रदेशची मुलगी या सोशल मिडीया मधुन प्रेम जमलेल्या युगुलाचा आग्र्यावरुन पळुन येऊन भोर तालुक्यातील भिलारेवाडी येथे आसरा घेतला.

नसरापूर - नागपुर महाराष्ट्राचा मुलगा व आग्रा उत्तर प्रदेशची मुलगी या सोशल मिडीया मधुन प्रेम जमलेल्या युगुलाचा आग्र्यावरुन पळुन येऊन भोर तालुक्यातील भिलारेवाडी येथे आसरा घेतला. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या आई-वडीलांनी केलेल्या तक्रारीनुसार आग्रा उत्तरप्रदेश पोलिसांनी मोबाईल वरुन तपास करत नसरापूर राजगड पोलिस ठाण्याच्या मदतीने महाराष्ट्रातील भोर तालुक्यातील भिलारेवाडी येथे या प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले. मोबाईलमुळे सुरु झालेले हे प्रेम प्रकरणाची अखेर देखील मोबाईलमुळेच झाली.

ताजमहल हे प्रेमाचे जगविख्यात प्रतिक असलेल्या आग्रा शहरातील अल्पवयीन मुलगी व नागपुर शहरातील मुलगा दिलीप उर्फ रमेश दुधबरेय्या (वय-27) यांची मोबाईलवर पब्जी गेम खेळताना ओळख झाली. व त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघानी एकत्र राहण्याचा निर्णय घेत पळुन जायचे ठरवले. दिलीप याने आग्रा रेल्वेस्टेशनला बोलावुन तेथे जाऊन मुलीला घेऊन महाराष्ट्रात आला. पुणे येथे आल्यावर काम शोधताना त्यांना भोर तालुक्यातील भिलारेवाडी येथे रोजंदारीचे काम मिळाले. सुमारे दिड ते दोन महिने ते या ठिकाणी राहीले. दरम्यान, मुलीच्या आई-वडीलांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार तेथील शहागंज पोलिसांकडे केली. त्यांनी मुलीच्या फोन काँल वरुन मित्र दिलीपचा नंबर मिळवला. व त्याच्या लोकेशनचा तपास सुरु केला.

काही दिवसांनी त्यांना महाराष्ट्रातील भोर तालुक्यातील लोकेशन मिळाल्यावर तेथील पोलिस उपनिरीक्षक अरविंद तोमर, हवालदार अशिषकुमार यादव, महिला पोलिस कर्मचारी डॉली चौहान, व मुलीचे कुटुंबीय राजगड नसरापूर पोलिस ठाण्यात आले. व त्यांना नसरापूरचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह फौजदार संजय सुतनासे, हवालदार शरद धेंडे, महेश खऱात, महेश सुर्यवंशी, भागीरथ घुले यांनी सहकार्य करत दिलीप याच्या लोकेशनवरुन तपास करत नसरापूर जवळ भिलारेवाडी येथे जाऊन तेथे रोजंदारीचे काम करत राहणारया दोघांना ताब्यात घेतले.

मुलगी अल्पवयीन असल्याने दिलीप यास मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आग्रा पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुलीला कुटुंबीयांनी ताब्यात घेऊन सर्व जण आग्र्याकडे रवाना झाले. मोबाईलमुळे सुरु झालेली दोघांची प्रेमकहाणी मोबाईलच्या लोकेशनमुळेच सापडली व या औटघटकेच्या प्रेमाची अखेर झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com