पुणे शहरात आज कमी दाबाने पाणीपुरवठा

जनता वसाहत, सिंहगड रस्ता - मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व बसवण्याचे काम करताना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी.
जनता वसाहत, सिंहगड रस्ता - मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व बसवण्याचे काम करताना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी.

पुणे - पु. ल. देशपांडे उद्यानामागे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (ता. २६) रात्री पूर्ण करण्यात आले. रविवारी (ता. २७) शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागे रस्त्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी जेसीबीचा धक्का लागल्याने ३ मीटर व्यासाची जलवाहिनी खराब झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊ लागली. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागणार असल्याने शनिवारी (ता. २६) दिवसभर लष्कर, एसएनडीटी, पर्वती, बंडगार्डन, वडगाव या जलकेंद्रांमधून होणारा पाणी पुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे निम्म्या पुण्यात पाणी नव्हते.

महापालिकेने शनिवारी सकाळपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. आज नवीन व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे.

शनिवारी पाणी पुरवठा बंद असला तरी आज सकाळी कात्रज, सुखसागर नगर, धनकवडी, बालाजीनगर, धायरी, वडगाव, सहकारनगर, कोंढवा येथील बऱ्याच भागात पाणीपुरवठा झाला. दुरुस्तीच्या कामामुळे आज दिवसभर पाण्याच्या टाक्‍या भरता आलेल्या नाहीत. रात्री काम पूर्ण झाल्यानंतर टाक्‍या भरण्यासाठी पाणी सोडले जाईल. त्यामुळे रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. 

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘शनिवारी सकाळी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते, रात्री आठपर्यंत काम पूर्ण झाले. त्यानंतर जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. रविवारी शहरात कमी दाबाने पाणी येईल.’’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com