ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटतोय वाहतूकदाररूपी कोल्हा  

shugarcane
shugarcane
Updated on

केडगाव (पुणे) : सध्या गुळाचा भाव प्रतिक्विंटल सुमारे 3500 रुपये असताना उसाला मात्र प्रतिटन 1700 ते 1900 रुपये भाव मिळत आहे. भावात मोठी तफावत असल्याची दौंड तालुक्‍यातील ऊस उत्पादकांची तक्रार आहे. यात गुऱ्हाळ मालकांपेक्षा ऊस वाहतूकदार जास्त नफा कमवत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्व घटक अडचणीत आहेत. फळबागा व तरकारीने शेतकऱ्यांना हात न दिल्याने ऊस हेच हक्काचे पीक वाटत होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुऱ्हाळे दौंड तालुक्‍यात आहेत. यातील बहुतांश गुऱ्हाळे परप्रांतीय चालवतात. शेतकरी त्यांना थेट ऊस देत नाहीत.

बहुतांश गुऱ्हाळांचे जागा मालक हे ऊस पुरवठादार म्हणून काम करतात. ते शेतकऱ्यांकडून कमी भावात ऊस घेऊन परप्रांतीय गुऱ्हाळ चालकास चढ्या भावाने विक्री करतात. वाहतूकदारास तोडणी व वाहतुकीचा खर्च येतो. गुऱ्हाळ चालकास जेमतेम तरी परवडते. शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा वाहतूकदार गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आहेत. वाहतूकदारांची संघटना आहे. कोणी जास्त दराने ऊस खरेदी केला, तर संघटना त्याला समज देते. 

पारगाव (ता. दौंड) येथे उसाचे भाव व प्रदूषण, याबाबत गुऱ्हाळ चालक, वाहतूकदार, शेतकरी यांची नुकतीच बैठक झाली. तेव्हा वाहतूकदारांनी सांगितले की, ज्याला परवडेल तो ऊस देईल. दराचा विषय बैठकीत घ्यायचा नाही. ऊस वाहतूक धंद्यात भांडवली गुंतवणूक मोठी आहे. तोडणी- वाहतूक खर्च जाऊन आम्हाला टनाला सुमारे 100 रुपये शिल्लक राहतात. मजूर परजिल्ह्यातून आणावे लागतात. त्यांना उचल द्यावी लागते. गुऱ्हाळ चालक काटा पेमेंट देत नाहीत. तो पळून गेला तरी शेतकऱ्याला आम्हाला पैसे द्यावेच लागतात. 

कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे ते गुऱ्हाळ चालक व वाहतूकदारांकडे चकरा मारत आहेत. दौंड तालुक्‍यात यंदा 25 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे साखर कारखाने उशिरापर्यंत चालवावे लागतील, असे कारखानदारांचे मत आहे. 

दौंड तालुक्‍यात 400 गुऱ्हाळे आहेत. गुळाला प्रतिक्विंटल 3500 रुपये भाव मिळत असून, शेतकऱ्यांच्या उसाला 
1700 ते 1900 रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. ऊस तोडणी व वाहतुकीसाठी 350 ते 400 रुपये खर्च होत असतो. वाहतूकदारांकडून गुऱ्हाळ चालकांना 2800 ते 3100 रुपये प्रतिक्विंटल दराने उसाची विक्री केली जाते. एक टन उसापासून 110 ते 120 किलो गूळनिर्मिती होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com