The spot near Narayangaon–Junnar road where a youth was attacked by a leopard during the night.
Sakal
पुणे
Pune News: नशीब बलवत्तर ! 'बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी': अंधारात मोबाईलवर बोलणे आलं अंगलट, नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगतची थरारक घटना..
Narayangaon Junnar road: स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बिबट्याचे दर्शन वाढल्याने परिसरात गस्तही वाढवण्यात आली आहे. घटना थरारक असली तरी तरुणाचा जीव वाचल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
-रवींद्र पाटे
नारायणगाव : मोबाईलवर बोलत अंधारात उभा असलेला तनिष नवनाथ परदेशी( वय18, राहणार नारायणगाव ) हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. ही घटना आज रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत असलेल्या साकार नगरी सोसायटी जवळ घडली.

