मुरुम उत्तखन्न करणाऱ्यांना तलाठ्याने रोखले, मात्र माफियांनी...

प्रा. प्रशांत चवरे
Wednesday, 17 June 2020

इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी व अकोले गावामध्ये अवैधरित्या मुरुम उत्खनन करत असल्याचे गावकामगार तलाठी महादेव भारती यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते सबंधितांना याबाबत विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी येथे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्यांनी विचारणा करण्यास गेलेल्या तलाठ्याला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मात्र, या निमित्ताने अवैध माती व वाळू उपसा करणाऱ्या गुंडाची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

पुण्यात आरटीओचे कामकाज पूर्ववत होणार

याबाबत गावकामगार तलाठी महादेव श्रीराम भारती यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी कुंडलिक गोरख बनसोडे(वय २२) व बाबासाहेब अनिल पाटील- वाघमोडे (वय ३१, दोघेही रा. काझड, ता. इंदापूर) यांना अटक करण्यात आली आहे. 

पुण्यात आता पीएपी बससेवा सुरू होणार

भिगवण व परिसरामध्ये अवैध माती व वाळू उपसा नेहमीच जोमात असतो. यामध्ये महसूल विभागाने हस्तक्षेप केल्यानंतर सबंधित कर्मचाऱ्यास धमक्या किंवा मारहाणीचे प्रकार घडतात. इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी व अकोले गावामध्ये अवैधरित्या मुरुम उत्खनन करत असल्याचे गावकामगार तलाठी महादेव भारती यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते सबंधितांना याबाबत विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलची चावी काढुन घेऊन लॅपटॉप काढुन घेत धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. 

झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करतात असं काही

या प्रकरणी कुंडलिक बनसोडे व बाबासाहेब पाटील यांच्यासह आणखी चार अज्ञातांविरूद्ध भिगवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, पोलिस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, प्रवीण मोरे, अक्षय जावळे यांचे पथकाने दोन आरोपींना शिताफिने भिगवण येथे जेरबंद केले. या आरोपींना इंदापूर न्यायालयांने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mafia beats revenue employee in Indapur taluka