केंद्राच्या विरोधात अजितदादाही मैदानात; कृषी विधेयकावर घेतली परखड भूमिका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, यासाठी राज्य सरकारने चांगले वकील दिले आहेत. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालय टिकू नये, असे कोणत्याही राज्य सरकारला वाटणार नाही.

पुणे : ''लोकसभेत नुकतेच मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांचा विरोध आहे. हे विधेयक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे नाही. कृषी विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी होऊ नये, असा आमचा प्रयत्न राहील. परंतु हे करताना विधेयकामुळे नवीन काय प्रश्न निर्माण होतील, तसेच न्यायालयात गेल्यानंतर काय होईल, याचा अभ्यास करीत आहोत,'' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रयत्नशील

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्नशील आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि 'सारथी' संस्थेला निधी उपलब्ध करून दिला, पण हे निर्णय जुनेच असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

याबाबत पवार म्हणाले, हे जुने निर्णय असले तरी त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, यासाठी राज्य सरकारने चांगले वकील दिले आहेत. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालय टिकू नये, असे कोणत्याही राज्य सरकारला वाटणार नाही.

तमिळनाडू आणि इतर राज्यात दिलेल्या आरक्षणाबाबत न्यायालयात याचिका दाखल आहेत. परंतु न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही. मात्र मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय खंडपीठाकडे सोपवताना स्थगिती दिली, याबाबत आश्चर्य वाटते. मराठा आरक्षण मिळावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष, मराठा क्रांती मोर्चासह इतर संघटना आणि तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करण्यात येत आहे.

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

म्हणून ते ट्विट डिलिट केले...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'भारतीय जनसंघाचे संस्थापक स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन', असे ट्विट केले होते. त्यांनी काही वेळातच हे ट्विट मागे घेतले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. याबद्दल पवार म्हणाले, 'ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबद्दल चांगले बोलणे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र समाजकारण, राजकारण करताना काही बाबी वरिष्ठांच्या ऐकाव्या लागतात. त्यामुळे हे ट्विट डिलीट केले. माझ्या दृष्टीने कोरोना, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, बेरोजगारी हे महत्त्वाचे विषय आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Dy CM Ajit Pawar commented on farm Bills