Pune : राज्य सरकारच्या ३०० कोटींकडे महापालिकेचे लक्ष

महापालिकेच्या उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी महसूल समितीची बैठक घेण्यात आली
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे : महापालिकेला उत्पन्न वाढिसाठी प्रयत्न करावे लागत असे असताना राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्काचे ३०० कोटी अद्याप मिळालेले नाहीत. हे पैसे मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप केवळ ३४ कोटी रुपयेच जमा झाले आहेत.

महापालिकेच्या उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी महसूल समितीची बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या मिळकत कर विभागान् नुकताच १ हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. यंदा चार महिन्यात प्रथमच २२ हजार नव्या मिळकतींची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षाभरात ४२ हजार मिळकतींची नोंद झाली होती, यंदा नव्याने आलेल्या २३ गावांमधील घरांची, इमारतींची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे.

Pune Municipal Corporation
मोक्काच्या कारवाईबाबत कठोर, नंबरगेम मध्ये आम्ही नाही - गुप्ता

तसेच बेकायदा बांधकामांवर कर अकारणी करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. यावर्षी बांधकाम शुल्कातून १ हजार १८५ कोटी रुपये इतके उत्पन्न गृहीत धरले आहे. पहील्या पाच महीन्यात सहाशे कोटी रुपये जमा झाले आहेत. जीएसटीमधून २ हजार १९३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचा वाटा राज्य सरकारकडून नियमितपणे येत आहे. तसेच मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे तीनशे कोटी रुपये राज्य सरकारकडे थकले आहे.

Pune Municipal Corporation
वहिनी...भावोजी अन् आमचे हे...

ही थकबाकी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, यातील पहीला ३४ कोटी रुपये महापालिकेला मंगळवारी मिळाले आहे. उर्वरीत रक्कम ही दिवाळीपुर्वी आणि दिवाळीनंतर टप्प्या टप्प्याने महापालिकेला मिळेल. यावर्षी साधारणपणे साडे हजार कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळू शकेल, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com