

Maharashtra Land Titling Act Bill Likely in Winter Session to Ensure Secure Land Ownership and Transparent Property Deals
sakal
पुणे : जमीन तुमची आहे, त्यामुळे तिचा मालकी हक्क तुम्हालाच सिद्ध करावा लागतो; परंतु हे लवकरच बदलणार आहे. जमीन कोणाची आहे, हे आता सरकार सांगणार आहे. त्यासाठी ‘जमीन मालकी हक्क कायदा’ (महाराष्ट्र लँड टायटलिंग ॲक्ट) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीचे विधेयक तयार झाले असून हिवाळी अधिवेशनात ते मांडले जाण्याची शक्यता आहे.