Pune : मनसेच्या 'त्या' पोस्ट मुळे पोलिसांची धावाधाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : मनसेच्या 'त्या' पोस्ट मुळे पोलिसांची धावाधाव

Pune : मनसेच्या 'त्या' पोस्ट मुळे पोलिसांची धावाधाव

वेल्हे : अकरा किल्ल्यावर शिवशाहीर पुरंदरेंच्या अस्थींचे विसर्जन करणार असल्याच्या निर्णय घेतल्याबाबतची पोस्ट मनसेकडून करण्यात आल्याबाबतचे वृत्त काही प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले. तर त्याचबरोबर काही शिवप्रेमी संघटनांनी मनसेच्या या निर्णयाला विरोध केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले राजगड व तोरण्याच्या पायथ्याशी वेल्हे पोलिसांकडून पहारा तैनात करण्यात आल्याने पोलिसांची चांगली धावपळ झाली.

हेही वाचा: हॉटेलमधील खाणे महागणार ! चालकांकडून खाद्यपदार्थाच्या दरात वाढ

शिवशाहीर बाबासाहेबांनी १००व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांच्या अस्थींचे विसर्जन ११ किल्ल्यावर करण्याचा निर्णय घेतल्या बाबतचे वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झाले. तर काही शिवप्रेमी संघटनांकडून विरोध करून मनसे च्या त्या निर्णयाला विरोध करण्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत असल्याबाबतच्या पार्श्वभूमीवर वेल्हे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून किल्ले तोरणा, किल्ले राजगड च्या पाल बुद्रुक ,व गुंजवणे पायथाशी काल पासून पहारा तैनात केला असून पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

हेही वाचा: शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती ते पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद

याबाबत वेल्हे पोलीस स्टेशन सह्ययक पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी चा उपाय म्हणून काळजी घेतली जात असून असा कोणताही प्रकार अद्याप किल्ल्यावर घडला नाही. तर वेल्हे तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दिगंबर चोरघे म्हणाले, अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना आम्हास मिळाल्या नसून बहुतेक ही पोस्ट खोटी असू शकते.

loading image
go to top