agnWeather-forecast-Aug- 21_txt.txt

agnWeather-forecast-Aug- 21_txt.txt
Published on

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. विजांसह पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ईशान्य मध्य प्रदेश परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसर, मुझफ्फराबाद, कानपूर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, दाल्तोंगंज, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम होता.
शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सिंधुदुर्गातील मालवण येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. आज (ता. २२) सोलापूरसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
‎---
‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
‎पुणे---२८.९---२२
अहिल्यानगर---३०.८---२४.७
जळगाव---३२.४---२१.८
जेऊर---३३---२०.५
‎‎कोल्हापूर---२८.५---२२.१
‎महाबळेश्वर---१९.६---१७.४
मालेगाव---३१.४---२१.८
‎‎नाशिक---२७.७---२१.६
निफाड---२९.८---२१.९
‎सांगली---३०.७---२२.२
सातारा---२८.८---२२.३
‎सोलापूर---३३.४---निरंक
‎सांताक्रूझ---३१---२६.६
डहाणू---३२.७---२४.३
रत्नागिरी---३०.५---२६
छत्रपती संभाजीनगर---३०.६---२२
धाराशिव---३०.८---२०.७
परभणी---३२.५---२२
परभणी (कृषी)---३२---२१.१
अकोला---३०.२---२४.५
अमरावती---३०.२---२२.९
ब्रह्मपूरी---३२.९---२३.५
बुलडाणा---३०.६---२२.३
चंद्रपूर---३२.६---२५.०
गडचिरोली---३०.४---२४.८
‎गोंदिया---३१.४---२२.२
‎नागपूर---३३.२---२३.६
‎वर्धा---३२.५---२४.५
‎वाशीम---२८.६---२०.२
‎यवतमाळ---२८.४---१८.४
‎----
--चौकट--
‎सरासरी तापमान (अंश से.)
‎विभाग---किमान---कमाल
‎उत्तर महाराष्ट्र---२१.६---३२.४
‎पश्‍चिम महाराष्ट्र---१७.४---३३.४
‎कोकण---२४.३--३२.७
मराठवाडा---२०.७---३२.५
‎विदर्भ---१८.४---३३.२
---
फोटो आहे. (agnDistrict rain forecast)
फोटो ओळ : शनिवारी (ता. २२) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :
विजांसह पावसाची शक्यता :
सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

Marathi News Esakal
www.esakal.com