पुणे-मुंबई द्रृतगती मार्गावर जाताय? मग, ही महत्वाची बातमी वाचा

mumbai-pune-expressway.jpg
mumbai-pune-expressway.jpg

पिंपरी चिंचवड : पुणे-मुंबई द्रृतगती मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. सध्या ताशी120 किमीची वेगमर्यादा असून आता ही वेगमर्यादा रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ताशी 100 किमी अशी करण्यात आली आहे. द्रृतगती मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

चालकासह आठ प्रवासी असलेली वाहने प्रति तास १०० किमी, नऊ पेक्षा अधिक क्षमतेची प्रवासी वाहने प्रतितास 80 किमी तर, मालवाहू वाहने प्रतितास 80 किमी या वेगाने चालवावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व बोगद्यांमध्ये वेगमर्यादा 80 किमी प्रतितास तर, वळण रस्त्यावर प्रतितास ३० किमी या वेगाने वाहने चालवावी लागणार आहेत.
मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार केली जाणार आहे.

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com