

Sugarcane Crushing Season Begins Across Maharashtra With 92 Sugar Factories Operating While Only One Mill Starts in Kolhapur
sakal
पुणे: राज्यात ऊस गाळप हंगामाच्या पहिल्या दहा दिवसांत ९२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले. या कारखान्यांनी आतापर्यंत ४३ लाख ८७ हजार टन उसाचे गाळप करून ३० लाख ८७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर निव्वळ साखरेचा उतारा ७.०४ टक्के नोंदविण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकाच कारखान्याने गाळप सुरू केले आहे.