

Maharashtra Becomes First State to Introduce Land Ownership Rights Law from July
sakal
पुणे/कात्रज : ‘‘जमीन मालकी हक्क कायदा (लँड टायटलिंग ॲक्ट) जुलै महिन्यापासून राज्यात लागू होणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता ही ‘निश्चित मालमत्ता’ म्हणून गणली जाईल. ही मालमत्ता जगातील कोणत्याही देशात ‘कॅश’ करता येणे शक्य होणार आहे,’’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.