

Admission Confusion to End as Maharashtra Sets Up District-Level Student Help Centers
sakal
पुणे: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन, विद्यार्थी-पालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यात एक ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ उभारण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० केंद्रे सुरू करण्यात येतील. मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपूरमध्ये दोन केंद्रे असणार आहेत. या केंद्रांची सेवा बुधवारपासून (ता. १०) सुरू होणार आहे.