

Maharashtra rain forecast pune alert
esakal
Maharashtra rainfall : राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील ४ दिवस ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.