Fraud Case in Share Market Investment
sakal
घोडेगाव : एडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करून तसेच शेअर मार्केटिंगच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणाऱ्या आरोपी सिद्धेश मनोज काळे (राहणार कोलदरे ता. आंबेगाव) याला तब्बल एक वर्षांनी अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील त्याचे दोन साथीदार गणेश दत्तात्रय गव्हाणे (राहणार साल ता आंबेगाव) व राहुल दिलीप काळे (राहणार शिंदेवाडी ता आंबेगाव ) यांना कोर्टातून यापूर्वीच जामीन मिळाला आहे.