
"Big boost for Pune as IIM Mumbai’s new centre gets approval – training to begin in 2026."
Sakal
पुणे: पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला जाणार आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन संस्था आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात सुरू होणार असून, यामुळे पुण्याच्या शैक्षणिक ओळखीला जागतिक आयाम लाभणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आयआयएमच्या डीन कमिटी आणि ॲकॅडमिक कौन्सिलने मंजुरी दिली आहे.