‘दीनबंधू’ महात्मा जोतिराव फुले

शरद जयसिंगराव नवले
Friday, 27 November 2020

महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. फुले दांपत्याने स्त्रियांना नवजीवन दिले. शनिवारी (ता. २८) जोतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने...

महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. फुले दांपत्याने स्त्रियांना नवजीवन दिले. शनिवारी (ता. २८) जोतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महात्मा फुले हे दीनदुबळे व दलितांचे नेते होते. महात्मा फुले साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला पुण्यात वानवडी येथे महात्मा फुले स्मारक सभागृहात साजरे होणार आहे. त्याच्या अध्यक्षा सुवर्णा पवार या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘स्त्री उद्धारक सावित्रीबाई फुले’, ‘असे घडले बाबासाहेब’, ‘समतेचे दूत महात्मा फुले’ अशी अनेक सामाजिक विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. या संमेलनाला एक विचारवंत स्त्री लाभते हे एक मोठे भाग्यच होय. त्यांना साहित्याची उत्तम जाण व जाणीव आहे.

मोठी बातमी: दौंड रेल्वे स्टेशनवरील कॅन्टीनला लागली आग; स्टेशनवर उडाला गोंधळ

महात्मा फुले व त्यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आमूलाग्र कार्य केले. त्या दांपत्याने स्त्री शिक्षणाचे बीज प्रथम भारतात रोवले. त्याचा बहरलेला वटवृक्ष झाला आहे. त्यासाठी त्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या. त्यांच्या अंगावर शेण फेकले गेले. इतक्‍या नीच स्तरावर त्या काळचा बुरसटलेला समाज होता. तरी न डगमगता, न घाबरता ब्रिटिश मिशनऱ्यांच्या मदतीने सामाजिक क्रांती केलीच. ज्या काळी स्त्री फक्त उपभोग्य होती; चूल नि मूल यातच ती जन्मभर गाडली गेली होती, त्यातून या दांपत्याने त्यांना बाहेर खेचून काढले. स्त्रियांना नवजीवन दिले. हे फुले यांचे कार्य, क्रांती अमर आहे.

...तर बांधकाम व्यावसायिक देशाधडीला लागतील; ग्राहकांनाही बसेल आर्थिक फटका

बुधवार पेठेतील भिडे वाड्यात या दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथे या दांपत्याच्या स्मरणार्थ लवकर राष्ट्रीय स्मारक व्हावे, त्यांचे पोस्टाचे तिकीट छापावे, त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान द्यावा, त्यांचा आदर्श आजच्या युवक-युवतींनी घ्यावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahatma jyotiba phule death anniversary