मविआचे भाजप नेत्यांविरुद्ध दडपशाहीचे राजकारण - हर्षवर्धन पाटील

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलीस ठाण्यासमोर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटीलSakal

इंदापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायबर क्राईमकडून बजावलेली नोटीस ही राज्यातील महाविकास आघाडीसरकारच्या सुडाचे व दडपशाहीच्या राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे. महाआघाडीचे हे कृत्य निषेधार्ह आहे असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

सायबर क्राईम कडून राज्याचे माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर भाजपच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलीस ठाण्यासमोर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. 

हर्षवर्धन पाटील
पुणे : कर्ज देण्याच्या बहाण्याने सव्वासहा लाख लंपास; गुन्हा दाखल

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे व मंत्र्यांचे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत .त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून भाजपच्या नेत्यांना नामोहरम करण्याच्या उद्देशाने त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून राज्यसरकारकडून शासनाचा दुरुपयोग केला जात आहे.राज्यात ज्यावेळीमहाविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार स्थापन झाले त्यावेळी पोलीस खात्यांमधील अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण घेवाण झाली.

या सर्वांचे रेकॉर्डिंग पोलीस खात्यातील लोकांच्या मार्फत झाले. गुप्तचर यंत्रणेकडे हे रेकॉर्डिंग जमा झाले असून त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नोटीस बजावण्यातआली आहे. त्यामुळे राज्यात शासनाविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.शरद जामदार व रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे यांनीमहाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.

यावेळी भाजपचे भरत शहा,विलास वाघमोडे ,शकील सय्यद, अॅड.कृष्णाजी यादव, देवराज जाधव, मारुतराव वनवे, अतुल तेरखेडकर, कैलास कदम, राम आसबे, संतोष देवकर, बापू जामदार, हर्षवर्धन कांबळे, दादा पिसे, गोरख शिंदे, धनंजय पाटील, शिवाजी शिंदे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com