esakal | आमदार सुनील शेळकेंच्या मावळमध्ये भाजपचाही विजयाचा दावा!
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार सुनील शेळकेंच्या मावळमध्ये भाजपचाही विजयाचा दावा!

विशेषतः महाविकास आघाडीने 57 ग्रामपंचायतींपैकी 40 ते 45 ग्रामपंचायतीवर दावा सांगितला असून, भाजपने 38 ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात आल्याचे म्हटले आहे.

आमदार सुनील शेळकेंच्या मावळमध्ये भाजपचाही विजयाचा दावा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवर व पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत, असे मतदानापर्यंत म्हणणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निकालानंतर मात्र जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याच पक्षाकडे अथवा आघाडीकडे आल्याचा दावा केला आहे.

Indapur Election Result 2021 : पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी

आमदार सुनिल शेळके यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री असलेले बाळा भेगडे यांचा 92 हजार मतांनी पराभव केला होता. आता ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त हे दोन्ही गट आमने-सामने होते. आता दोन्ही गट निकालानंतर मात्र जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याच पक्षाकडे अथवा आघाडीकडे आल्याचा दावा करत आहेत.

विशेषतः महाविकास आघाडीने 57 ग्रामपंचायतींपैकी 40 ते 45 ग्रामपंचायतीवर दावा सांगितला असून, भाजपने 38 ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात आल्याचे म्हटले आहे.

मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती यापूर्वीच पूर्णतः बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 49 ग्रामपंचायतींच्या 316 जागांची मतमोजणी सोमवारी तळेगाव दाभाडे येथे झाली. मतदानापर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निकालाबाबत कोणताही दावा केला नव्हता. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या गावपातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन लढविल्या जातात. त्या पक्षीय पातळीवर व पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत असे त्यांचे म्हणणे होते.

Purandar Election Result: पुरंदर तालुका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व; जाणून...

निकालानंतर मात्र सर्वच पक्षांनी विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. 40 ते 45 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजय मिळविल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर 38 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून सर्वांत जास्त पक्षाचे सदस्य निवडून आल्याचा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे.

loading image
go to top