दापोडे येथील हॉटेल चालक गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

मनोज कुंभार
Tuesday, 24 November 2020

वेल्हे तालुक्यातील दापोडे येथील हॉटेल चालक गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शाम बाळासाहेब काळे (वय-२३) याला  वेल्हे ग्रामीण पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. त्याच्या दोन साथी दारांना या अगोदर अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहे तर  काळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती वेल्हेचे सह्ययक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

वेल्हे, (पुणे) - वेल्हे तालुक्यातील दापोडे येथील हॉटेल चालक गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शाम बाळासाहेब काळे (वय-२३) याला  वेल्हे ग्रामीण पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. त्याच्या दोन साथी दारांना या अगोदर अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहे तर  काळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती वेल्हेचे सह्ययक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या बावीस दिवसांपासून शाम काळे हा पर जिल्ह्यात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे लपून बसला होता. याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार वेल्हे तालुक्यातील दापोडे येथे दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता हॅाटेलचालक विलास नथु बोरगे यांच्यावर अज्ञात तीन इसमांनी गोळीबार केला होता. त्यात बोरगे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी करंजावणे मार्गे कुसगाव खिंडीतुन पलायन केले होते. वेल्हे पोलीस व पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस आरोपींच्या मागावर होते. दि. ४ नोव्हेंबर रोजी पोलीसांनी यातील दोन आरोपींना जेरबंद केले होते. तर तिसरा आरोपी शाम काळे यास
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, कॉन्स्टेबल विशाल मोरे, सूर्यकांत ओमासे, अभय बर्गे, दिपक जाधव, आदींनी कारवाई करत अटक केली.

पुणे ते जयपूर व्हाया कोल्हापूर; पुणे पोलिस पाषाणकरांपर्यंत कसे पोचले?

पोलीसांनी संदीप उर्फ सॅंडी सिद्धेश्वर धुमाळ  (वय २०) रा. खोली नं ५११, साई अपार्टमेंट, हनुमान नगर जांभुळवाडी, रोड आंबेगाव खुर्द पुणे २) रुपेश उर्फ भैय्या श्रावण पालखे (वय २०) राहणार लेन नं ६, टेल्को कॅालनी, दत्तनगर पोलीस चौकीशेजारी, जांभुळवाडी रोड, पुणे. यांना अटक केली होती.  यातील मुख्य आरोपी असलेला शाम काळे याला वेल्हे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: main accused Dapode hotel owner shooting case arrested