अवकाळी पावसामुळे वीटभट्टीचे मोठे नुकसान; व्यावसायिक सापडले संकटात

Major damage to brick kiln due to unseasonal rains in Ambegav Taluka
Major damage to brick kiln due to unseasonal rains in Ambegav Taluka

पारगाव(पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात काल सायंकाळी व रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. नव्याने लागवड केलेला कांदा व काढणी केलेल्या कांद्याचे नूकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसु शकतो. वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु

धामणी, जारकरवाडी, वैदवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पारगाव, खडकवाडी, पोंदेवाडी परिसरात काल सायंकाळी व राञी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने काढणीला आलेल्या ज्वारीच्या पिकाचे नूकसान होऊन चिकटा पडण्याचा धोका वाढला आहे. कांदा लागवड झालेल्या शेतात पाणी साचले आहे, त्यामुळे लागवड केलेल्या कांद्याचे नूकसान होण्याची शक्यता आहे. या वर्षी कांद्याला बाजारभाव मिळाला नाही.

सीरमनंतर स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता; बैठक सुरु

सतत पडणाऱ्या पावसाने कांदा रोपे सडून गेली. त्यामुळे लागवड करण्यास उशीर झाला. कांदा बियाणे महाग झाले काही शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे बियाणे न मिळाल्याने उगवण कमी झाली. त्यातच पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे धामणी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगीतले तर वीट भट्टी व्यवसायिकांनी तयार करुन ठेवलेल्या मातीच्या कच्चा विटा पावासात भिजून फुटुन गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहीती वैदवाडी येथील वीटभट्टी व्यावसायिक ज्ञानेश्वर दरेकर यांनी दिली.    

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com