Ranjangaon Land Scam : माेठी बातमी! 'महागणपती रांजणगाव देवस्थानाचे ६५ एकर क्षेत्र गायब';थेट राज्यपालांकडे तक्रार, देवस्थान ट्रस्टही खडबडून जागे
“Major Temple Land Dispute : शिरूरचे तहसीलदार यांनी मंडलाधिकाऱ्यांच्या करवी चौकशी करून अहवाल तयार केला असून, तो पुढील कार्यवाही मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. सदर ६५ एकर क्षेत्र हे वतन रजिस्टरमध्ये नोंदीत आहे. मात्र, ते देवस्थानच्या मालकीहक्कपत्रातून गायब झाले आहे.
“Ranjangaon Mahaganpati temple trust raises alarm after 65 acres of land reportedly missing; complaint filed with Governor.”esakal
शिक्रापूर: अष्टविनायकांपैकी महागणपती रांजणगाव देवस्थानाच्या नावे असलेल्या ढोक सांगवी (ता. शिरूर) येथील तब्बल ६५ एकर जमीन क्षेत्र सातबारा उताऱ्यावरून गायब असून, याबाबत राज्यपालांकडे तक्रारदार शिवाजी असवले यांनी दाद मागितली आहे.