विद्यमान गाव कारभारीच सरकारी कारभारी बनवा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

राज्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या विद्यमान गाव कारभाऱ्यांनाच सरकारी गाव कारभारी बनवा, असे साकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते जालिंदर कामठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले आहे.

पुणे - राज्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या विद्यमान गाव कारभाऱ्यांनाच सरकारी गाव कारभारी बनवा, असे साकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते जालिंदर कामठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९९४ मध्ये यांनी विद्यमान सरपंचांनाच  प्रशासकपदी नेमले होते. पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचा आधार घ्यावा आणि या निर्णयाच्या आधारे विद्यमान सरपचांनाच प्रशासक म्हणून नेमले जावे, अशी आग्रही मागणी कामठे यांनी केली आहे.

ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!

शरद पवार यांच्या या निर्णयामुळे स्वत: कामठे यांना त्यावेळी पुणे जिल्ह्यातील कोंढवा-येवलेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी सुमारे सव्वा वर्ष काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा आणि नंतर प्रशासक अशा दोन्ही पदांवर काम करण्याचा अनुभव घेतला आहे‌ या अनुभवाचा आधारे पवार यांचा हा निर्णय योग्यच ठरला होता, असेही कामठे यांनी मुख्यमंत्री ठाकरे  आणि उपमुख्यमंत्री पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

बारावी ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा उडाला बोजवारा; पालकांच्या तक्रारींचा पाऊस

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात गावच्या कारभाराचा गाडा हाकण्यासाठी प्रशासक पदावर गावची इत्यंभूत माहिती असणारा अनुभवी व्यक्ती असणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा गावच्या विकासाला खिळ बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make the existing village steward the government steward