Ajit Pawar : देश प्रगतीपथावर नेण्यासाठी एकविचार आणि मोदींसारखे सक्षम नेतृत्व हवे

देश प्रगतीपथावर नेण्यासाठी एकविचार आणि मोदींसारखे सक्षम नेतृत्व लागते. तो एकविचार भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आदी घटकपक्षाकडे आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

माळेगाव - इंडिया आघाडीत ममता बॅनर्जींसह अनेक नेत्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांचा फुगा फुटला आहे. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी एकविचार आणि मोदींसारखे सक्षम नेतृत्व लागते. तो एकविचार भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आदी घटकपक्षाकडे आहे.

या पक्षांचे नेटवर्क व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील ऐकोपा महाराष्ट्रात मजबूत आहे. त्या ऐकोप्याचा फायदा बारामती तालुका लोकसभा मतदार संघासह सर्वत्र दिसून येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पणदरे (ता.बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी माळेगाव कारखान्याचे प्रमुख अॅड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, सचिन जगताप, स्वप्नील जगताप, तानाजी कोकरे, प्रमोद जगताप, नितीन जगताप, सचिन सातव, गणेश जगताप, पप्पु जगताप, मंगेश जगताप, सरपंच अजय सोनवणे, उपसरपंच मनोज जगताप, जे.पी. जगताप, दत्तात्रेय येळे, अविनाश गोफणे आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ठरवून दिलेल्या रणनितीच्या आधारे लोकांपुढे जा, माळेगाव व सोमेश्वर भागातील शिल्ल्क उसाचा प्रश्न संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने सोडवावा, पिकांसह जनावरांना पाण्याची उपलब्धता करून देण्यास शासन कटीबद्ध, उन्हाळी हंगामात नीरा डावा कालवा अखंडपणे कार्यान्वित राहिल, २० फेब्रूवारीच्या एकदिवशीय आदिवेशनात मराठा आरक्षणाबाबत कायदा होईल, या मुद्द्यांच्या आधारे पवार यांनी मेळाव्यात उपस्थितांना आपलेसे केले.

पवार म्हणाले, 'बारामती लोकसभा निवडणूकीत इंदापूरला हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, दौंडमध्ये राहूल कुल आदी नेते मंडळी एकादिलाने काम करणार आहेत. खडकवासला आदी भागात भाजपचा बालेकिंल्ला आहे. भोर, पुरंदर आदी भागात प्रचंड काम आपण उभे केले आहे.

त्या तुलनेत बारामतीत तर डोळे दिपतील ऐवढी विकास कामे मी केली. त्यामुळे या निवडणूकीत बारामतीकरांनी मला एकटे पडू देवू नका. माझा परिवार आता तुम्ही आहात. तुमच्यामुळेच मी आजवर राजकारणात यशस्वी झालो आहे. तसेच प्रेम याही निवडणूकीत मतदानाच्या रुपाने दाखवून द्या,' असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

`राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आता आधिकृत राष्ट्रीय अध्यक्ष झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने हा राष्ट्रवादी पक्ष पुढे जाईल. सर्वजाती धर्मातील लोकांना बरोबर घेवून जाण्याची शिकवण शिवाजी महाराजांनी घालून दिली आहे, तसेच काम माझ्याकडून होईल,`अशीही ग्वाही पवार यांनी दिली.

शेतकरी, उद्योजकांचा सन्मान...

पणदरे भागात एकरी ९० ते १०० टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. या गोष्टीला आधिक प्रोत्साहन देण्यासाठी अजित पवार यांच्या हस्ते प्रयोगशिल शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय शुगर संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त झालेले यशस्वी उद्योजक नितीन जगताप यांचाही सत्कार झाला. त्यामध्ये डॉ. राधेय खलाटे, कनिष्ठ अभियंता कुमार लोखंड यांचाही पवार यांनी सन्मान केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com