esakal | ......म्हणून ‘दीदीं’चा ‘खेला हो गया’
sakal

बोलून बातमी शोधा

mamta-banerjee

......म्हणून ‘दीदीं’चा ‘खेला हो गया’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पश्चिम बंगालच्या आबालवृद्धांनी भावनिक जवळीक साधणाऱ्या ‘दीदीं’ना त्यांची ‘मॉ, माटी आणि मानूष’ ही घोषणा ‘जननेता’ बनविते. त्यांच्या विजयाचा आम्हाला निश्चित आनंद आहे, असा सूर पुणे स्थित बंगाली भाषीकांच्या जुन्या पिढीत उमटत आहे. तर, बंगालमध्येआजवर औद्योगिकीकरण झाले नाही. ममता दीदींनी थोडाफार विकास केला. पण त्यातून रोजगार निर्माण झाला नाही. आजही बंगालच्या युवकांना राज्याबाहेर जावे लागते. भाजप निवडून आल्यास काही बदल झाला असता, अशी अपेक्षा बंगाली भाषिक युवकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: उद्योगांना येणार सहा महिन्यांत ‘अच्छे दिन’

''तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तुलनेत भारतीय जनता पक्षांमध्ये शिक्षित कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. राज्याच्या विकासासाठी शिक्षित मंत्र्यांची गरज आहे. त्यामुळे राज्यात भाजपाच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या तर नक्कीच त्याचा फायदा झाला असता. पश्‍चिम बंगालच्या विकासाला गती मिळाली असती. मात्र भाजपच्या वतीने हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे येथील मुस्लिम नागरिकांच्या नाराजीचा परिणाम या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाला आहे.''

- अर्णब चॅटर्जी, विद्यार्थी, पुणे

''माझा सारख्या युवकांना शिक्षण आणि रोजगारासाठी राज्याबाहेर जावे लागत आहे. राज्यात अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या तर परिवारापासून लांब राहण्याची वेळ येणार नाही. हाच विचार ठेवून भारतीय जनता पक्षाचे समर्थन केले, परंतु निवडणुकीचा निकालामुळे आम्ही नाराज झालो आहोत.''

- मेहकोला मुखर्जी, युवती, पुणे

''पश्चिम बंगालमध्ये खरं तर परिवर्तन अपेक्षीत होत. दीदींनी शहरांचा विकास तर केला मात्र उद्योग आणि नोकऱ्यांच्या दृष्टीने त्यांची कामगिरी काहीच नाही. भाजपच्या माध्यमातून सर्व युवकांना अपेक्षा होती उद्योगधंदे येतील. पण ते झालं नाही. भाजपचे मोठे नेते कोरोनाच्या स्थितीवर लक्ष द्यायचे सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. त्याच्या बद्दलही लोकांच्या मनात शेवटच्या टप्प्यात नाराजी होती.''

- अरित्रो चक्रबर्ती, युवक, पुणे

''पश्चिम बंगालच्या गाव खेड्यातील लोकांशी ममता बॅनर्जी यांच विशेष नात आहे. त्यांच्या बंगाली भाषेतील वत्कृत्वाने त्या खऱ्या अर्थाने जननेत्या आहेत. उद्योग आणि व्यवसाय हे बंगालचा ‘कल्चर’ नाही. त्यामुळे सर्वांचीच ती मानसिकता दिसत नाहीय बौद्धिक, शैक्षणिक आणि साहित्यात त्यांचा रस आहे. ममता जिंकल्याचा आनंद मला एक स्त्री म्हणून सर्वाधिक झाला आहे.''

- रोनिता राय घोष, उद्योजिका, पुणे

हेही वाचा: कोरोनाबाधितांनो, थेट अमेरिकेतील डॉक्टरांचा घ्या मोफत सल्ला

loading image