पुणे : बातमी डोळ्यांत पाणी आणणारी; अखेरचा श्वास घेतानाही त्यांनी केला परोपकार

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 22 मे 2020

भवानी पेठेत साडेतीनशे चौरस फुटाच्या दोन खोल्या म्हणजे, राजाराम येमूल आणि त्यांच्या कुटुंबातल्या आठ सदस्यांचा आसरा. सुरुवातीला येमूल महिन्याकाठच्या चार हजार रुपयांत महिनाभर काम करायचे.

पुणे : कोरोना रोज दोघा-तिघांचा जीव घेतोय...अन् रोज नको तेवढे रुग्ण सापडतायेत...मृत आणि रुग्णांच्या कुटुंबियांचा जीव मुठीत आलाय...मेंदुच्या विकाराने अंथरूणावर पडून असलेले ७६ वर्षांचे आजोबा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट' झाले; त्याच हॉस्पिटलमधल्या कोरोना मृत आणि रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. शेवटी मेंदुच्या विकाराने त्यांना अखेरचा श्वास घेतला. पण, आपला जीव तुटायच्या आधीच आपल्याकडचे तीन-साडेतीन लाख रुपये त्यांनी कोरोनाच्या रुग्णांसाठी दिले. 'माझा सगळा पैसा या रूग्णांच्या औषधांसाठी द्या' हे सांगत भवानी पेठेतल्या राजाराम येमुलांनी आपला शेवटचा श्वास घेतला आणि कोरोना रुग्णांकरिता आपल्या आयुष्याची पुंजी देऊ केली.

पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - पोलिसांनी पुण्यासाठी काढला नवा आदेश

भवानी पेठेत साडेतीनशे चौरस फुटाच्या दोन खोल्या म्हणजे, राजाराम येमूल आणि त्यांच्या कुटुंबातल्या आठ सदस्यांचा आसरा. सुरुवातीला येमूल महिन्याकाठच्या चार हजार रुपयांत महिनाभर काम करायचे. पण, तेवढ्या पैशात भागत नसल्यानं त्यांनी आपल्या आई-वडिलांचा विडीचा व्यवसायही सुरू केला. त्यानंतरच्या काळात ते विडी कामगारच राहिले. त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. याच काळात विडी कामगारांसाठी झटत राहिले. पण, गेल्या वर्षापासून त्यांना आजारांनी घेरलं आणि ते थेट अंथरूणाला खिळून राहिले. अशा अवस्थेतही विडीच्या व्यवसायाला हातभार लावायचे.

आणखी वाचा - एकाच वॉर्डात 101 कोरोना रुग्ण

कोरोनाच्या साथीत व्यवसायावर परिणाम झाला अन् राजाराम मुलांचे उरले-सुरलेही अवसान गळून पडले; ते काही अंथरूण उठले नाहीत; शेवटी खासगी रुग्णालयात उपचार करूनही ते बरे झाले नाहीत. त्यानंतर गेल्या आठवड्यांत त्यांनी सगळ्यांचाच निरोप घेतला.  हा निरोप घेताना त्यांनी कोरोना रुग्णांना बळ दिलं. आपल्याकडच्या साऱ्या पैशांच्या उपयोग हा लोकांच्या आरोग्यासाठी व्हावा, अशी अपेक्षाच नाहीत, तसे लिहून दिलयं. आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार त्यांच्या बँक खात्यासह जी काही रोकड आहे; ती महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे देण्याचा निर्णय राजाराम येमूल यांचा मुलगा रघुनाथ येमूल यांनी घेतला. रघुनाथ येमूल म्हणाले, "निराधारा लोकांना उपचार मिळावेत, ही वडिलांची अपेक्षा आहे. त्यानुसार त्यांच्याकडची सर्व रक्कम आम्ही महापालिकेला देणार आहोत. मात्र, त्या पैशांचा उपयोग हा आरोग्य सेवेसाठी व्हावा, ही त्यांची अपेक्षा होती."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man donated his all savings before dying in hospital