esakal | लग्नाआधीचा व्हिडिओ झाला व्हायरल; मित्रावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

cup.jpg

लग्नापुर्वी ठेवलेल्या शारिरीक संबंधाची अश्लील व्हिडिओ क्लिप, लग्नांनंतर चारच दिवसात सोशल मिडीयावर व्हायरल. लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.  

लग्नाआधीचा व्हिडिओ झाला व्हायरल; मित्रावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : ओळखीच्या तेवीस वर्षीय युवतीशी लग्नापुर्वी ठेवलेल्या शारीरिक संबधाची व्हिडिओ क्लिप बनवून, ती क्लिप तिच्या लग्नानंतर अवघ्या चारच दिवसात सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी हडपसर परीसरातील एका पंचवीस वर्षीय तरुणाच्या विरोधात बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

दरम्यान, सुरेश निवृत्ती धांदे (वय २५, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तो सध्या फरार झाला आहे. धांदे यास पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांदे याचे लोणी काळभोर परीसरातील एका तेवीस वर्षीय तरुणीशी वर्षभऱापुर्वी प्रेमसंबध होते. त्यावेळी सुरेशने संबधित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबध ठेवले होते. त्यानंतर काही दिवसांनी संबधित तरुणी शारिरीक संबधास नकार देत असल्याचे लक्षात येताच, धांदे याने सुरवातीच्या काळात ठेवलेल्या शारिरीक संबधांच्यावेळी चोरुन बनवलेली अश्लील व्हिडिओ क्लिप संबधित तरुणीला दाखवली. व ती क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत मागील वर्षभऱाच्या काळात वेळोवेळी शारीरीक बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

दरम्यान, धांदे याने लग्नास नकार दिल्यानंतर संबधित तरुणीचा विवाह दोन महिण्यांपुर्वी लोणी काळभोर परीसरातील एका तरुणाबरोबर झाला. लग्नानंतर संबधित विवाहिता माहेरी आली असता, धांदे यांने बनवलेली व्हिडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. ही बाब समजताच, संबधित विवाहितेने दोन दिवसांपुर्वी धांदे याच्या विरोधात पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top