Leopard : मंचर येथे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मच्या आवारात मंगळवारी रात्री बिबट्या; कर्मचाऱ्यांची उडाली धांदल

मंचर व एकलहरे( ता आंबेगाव) गावाच्या सरहद्दीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मच्या पत्र्याच्या छतावर बिबट्याने बैठक मारली आहे.
Leopard
LeopardSakal

मंचर - मंचर व एकलहरे( ता आंबेगाव) गावाच्या सरहद्दीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मच्या पत्र्याच्या छतावर बिबट्याने बैठक मारली आहे. काही वेळानंतर छतावरून खाली येऊन बिबट्या फेरफटका मारत होता.जवळपास 35 एकर क्षेत्र असून छता खालील भागात 3 हजार गाई व ५०० वासरे आहेत. बिबट्याच्या डरकाळीनी येथील कर्मचारी भयभीत झाले आहेत.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास छतावर वावरत असलेल्या बिबट्याला पाहून या ठिकाणी काम करणारे मजूर व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.भक्षाच्या शोधासाठी हा बिबट्या येथे आल्याचे भाग्यलक्ष्मी प्रकल्पाचे अधिकारी अशोक निघोट यांनी सांगितले. ते म्हणाले, 'येथे 35 एकर क्षेत्रात पात्र्याचे छत करून निवारा उभारलेला आहे.संकरित गाई व वासरांची संख्या मोठी आहे.

येथे बिबट्या व दोन बछड्यांचा वावर गेल्या आठ-दहा दिवसापासून आहे .पण आज थेट छतावरच बिबट्याने बैठक मारली आहे. छतावर सध्या बिबट्या फेरफटका मारत आहे .त्याच्या डरकाळ्यांच्या आवाजाने गाई व कर्मचारी भयभीत झाले आहेत. येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावावा ,'अशी मागणी मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे केली आहे.'

यासंदर्भात मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, बुधवारी (ता. ६) बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भाग्यलक्ष्मी डेअरी परिसरात पिंजरा लावला जाईल. बिबट्या जेरबंद होईपर्यंत वन खात्याचे कर्मचारी दिवसा व रात्री गस्त घालतील खबरदारीचा उपाय म्हणून तेथील कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. याबाबत वन खात्यामार्फत जनजागृतीचे कामही केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com