Leopard : बिबट्याचा वावर किंवा हल्ला झाल्यानंतर तात्काळ उपाययोजना करा; सुरेश भोर

बिबट्याचा पाळीव प्राण्यावर किंवा नागरिकांवर हल्ला झाल्यानंतर वनकर्मचारी व अधिकारी शेतकऱ्यांना व नागरिकांना सहकार्य करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देतात.
Suresh Bhor
Suresh BhorSakal
Summary

बिबट्याचा पाळीव प्राण्यावर किंवा नागरिकांवर हल्ला झाल्यानंतर वनकर्मचारी व अधिकारी शेतकऱ्यांना व नागरिकांना सहकार्य करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देतात.

मंचर - 'बिबट्याचा पाळीव प्राण्यावर किंवा नागरिकांवर हल्ला झाल्यानंतर वनकर्मचारी व अधिकारी शेतकऱ्यांना व नागरिकांना सहकार्य करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देतात. या प्रकारच्या निषेधार्थ वनखात्याच्या विरोधात आंदोलन करावे लागले. यापुढे वनखात्याने तातडीने घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे.अन्यथा पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष रस्यावर उतरेल.' असा निर्वानी चा इशारा शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला आहे.

पेठ- अवसरी (ता. आंबेगाव) घाटात असलेल्या मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर सोमवारी (ता. ३०) सुरेश भोर, तालुकाप्रमुख दिलीप पवळे, शहर प्रमुख प्रवीण टेमकर, जिल्हा संघटक युवासेना ॲड. योगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

'बिबट्याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब मदत करण्याचा सूचना वनकर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामात हयगय झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वनकर्मचारी व अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीसाठी प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविली जातील.' असे लेखी आश्वासन मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, 'अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शेतकरी रामदास भगवान शिंदे यांच्या २३ गावठी कोंबड्या बिबट या प्राण्याने फस्त केल्या आहेत.

या बाबत पंचनामा व इतर दस्तऐवज तयार केले आहेत. सदर कोंबड्यांची किंमत निश्चित करून पशुधन विकास अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र प्राप्त होताच प्रकरण वरिष्ठ कार्यालयात तत्काळ पाठविले जाईल. संबंधिताना आर्थिक मदत दिली जाईल. बिबट वावर असलेल्या ठिकाणी जनजागृतीसाठी फ्लेक्स लावणे, जनजागृती पत्रके घरोघरी वाटणे व रात्री गस्त घालणे आदी कामे केली जातात.नागरिकांना वनखात्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.' त्यानंतर सुरेश भोर यांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी विजय शेटे, बबनराव भोर, राजेश टेमकर, गौरव थोरात, रवींद्र म्हस्के, गोविंद इंदोरे,जालिंदर इंदोरे, चैतन्य टेमकर, शाम हसे, अशोक राक्षे, स्वप्निल भोर, रोहन भोर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com