Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंचरला दिवाळीचे स्वरूप: पाच हजार भाविकांना साजूक तुपातील लाडू वाटप व अन्नप्रसाद

अयोध्या येथे सोमवारी (ता.२२)होत असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंचर (ता.आंबेगाव) शहरात प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम, सीता माता व लक्ष्मण यांच्या मूर्तींची फुलांनी आकर्षक सजावट केली होती.
 प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पराग मिल्क फूड्सचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केला.
प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पराग मिल्क फूड्सचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केला.sakal

मंचर : “अयोध्या येथे सोमवारी (ता.२२)होत असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंचर (ता.आंबेगाव) शहरात प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम, सीता माता व लक्ष्मण यांच्या मूर्तींची फुलांनी आकर्षक सजावट केली होती. पुष्पवृष्टी व फटक्याची आतषबाजी करण्यात आली.घरोघरी भगवे ध्वज उभारून रांगोळ्याही रेखाटण्यात आल्या होत्या. दिवाळीप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला.पाच हजार भाविकांना प्रसाद म्हणून साजूक तुपातील लाडूंचे वाटप करण्यात आले.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पराग मिल्क फूड्सचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते श्रीराम पूजन व आरती करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना लाडू भरविल्यानंतर उपस्थितांना लाडूचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे नेते संजय थोरात,बजरंग दलाचे संतोष खांमकर, राष्ट्रवादीचे दत्ता थोरात, शिवसेनेचे अरुण गिरे, यात्रा समितीचे खजिनदार वसंतराव बाणखेले, अरविंद वळसे पाटील, सुहास बाणखेले, सुनिल बाणखेले, संतोष डोके,सागर काजळे, गणेश राऊत, गणेश खानदेशे, महेश थोरात उपस्थित होते. जय श्रीराम या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

जैन समाजाच्या व पराग मिल्कतर्फे सरबत व तीन हजार लाडू वाटप करण्यात आले. उपस्थितांना एलएडी स्क्रीनद्वारे आयोध्या येथील कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले. मंचर ग्रामस्थ व भैरवनाथ यात्रा समितीच्या वतीने तीन हजार भाविकांची अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. अन्नप्रसादासाठी शाही नीती मसाले यांनी मसाले उपलब्ध करून दिले.

 प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पराग मिल्क फूड्सचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केला.
Ayodha Ram Mandir: इतका हिंदू विरोध, द्वेष कशामुळे? निर्मला सीतारमण यांचा तमिळनाडू सरकारवर गंभीर आरोप

मंचर शहरातील श्रीराम, विठ्ठल रुख्मिणी, भैरवनाथ, चौंडेश्वरी, तपनेश्वर, मुक्ताई, हनुमान व जैन मंदिर अश्या एकूण ४० मंदिरावर तीन हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच मंदिरांवर विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. जे.के थोरात, प्रवीण मोरडे, जगदीश घिसे, योगेश बाणखेले, लक्ष्मण थोरात भक्ते, बजरंग दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी व्यवस्था पाहिली.

मंचर (ता.आंबेगाव) : प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पराग मिल्क फूड्सचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com