esakal | ...तर लक्षणे असलेल्या पेशंटची आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य
sakal

बोलून बातमी शोधा

rtpcr.jpg

लक्षणे असलेल्या रुग्णाची रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास आता पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकदा रॅपिड टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरही रुग्णांना त्रास होतो असा अनुभव आल्यानंतर आता राज्य शासनाने हे निर्देश जारी केले आहेत.

...तर लक्षणे असलेल्या पेशंटची आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : लक्षणे असलेल्या रुग्णाची रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास आता पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकदा रॅपिड टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरही रुग्णांना त्रास होतो असा अनुभव आल्यानंतर आता राज्य शासनाने हे निर्देश जारी केले आहेत. आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हे निर्देश जारी केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांना या बाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशभरात सगळीकडेच लक्षणे असलेल्या व रॅपिड टेस्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णांचे दोन स्वॅब घेऊन आरटीपीसीआर तपासणीही केली जाते. मात्र महाराष्ट्रात अशा तपासण्यांचे प्रमाण अवघे सात टक्के असल्याबद्दल केंद्रीय स्तरावरुन नाराजी व्यक्त झाली. राज्याचे मुख्य सचिवांच्या बैठकीत केंद्रीय सचिवांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. विविध व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये याबाबत राज्याच्या या टक्केवारीबाबत चर्चा झाली.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

 काही राज्यांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची रॅपिड टेस्ट निगेटीव्ह आल्यास त्याची पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के इतके आहे. या राज्यांच्या धर्तीवरच आता महाराष्ट्रातही लक्षणे असलेल्या रुग्णाचे एकाच वेळेस दोन स्वॅब घेतले जातील, रॅपिड तपासणी तातडीने होईल, ती निगेटीव्ह आल्यास लगेच दुसरा स्वॅब आरटीपीसीआर तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन स्वॅब घेतल्यामुळे रुग्णाला तपासणीसाठी दोनदा यावे लागत नाही. 

कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

यामुळे रॅपिड तपासणीत लक्षणे असलेला पण निगेटीव्ह आलेल्या रुग्णाची दोनदा तपासणी होऊन त्याला कोरोनाची लागण झाली की नाही हे लगेचच स्पष्ट होऊ शकेल. या मुळे आता लक्षणे असलेल्या रुग्णांना रॅपिड तपासणी निगेटीव्ह आली तरी आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.