खेड तालुक्यात लांडग्यांचा धुमाकूळ, अनेक शेळ्या ठार

राजेंद्र लोथे
गुरुवार, 29 मार्च 2018

चास (पुणे) - खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील मोहकल, चास, मिरजेवाडी परिसरात हिंस्त्र वन्यप्राणी असलेल्या लांडग्यांनी धुमाकूळ घातला आहे. हे लांडगे घरासमोर बांधलेल्या बकऱ्या, लहान करडे उचलून नेऊन फस्त करत आहेत. यामध्ये मोहकल येथील किसन रणपिसे, पोपट राऊत, विठ्ठल रणपिसे, संजय राऊत यांच्या शेळ्या, करडे घरासमोरुन उचलून नेऊन फस्त केली तर सुखदेव रणपिसे यांच्या कारड्याच्या गळ्याला चावा घेऊन जखमी केले मात्र नागरिकांनी आरडाओरडा केल्याने लांडग्यांनी तेथून पळ काढला.

घनवटवाडी येथील संतोष घनवट यांचा बोकड लाडग्यांनी पळून नेला तर एका शेळीचा घरासमोरच फडश्या पाडला तसेच भगवान घनवट यांचा बोकड, नारायण घनवट, बाबुराव गावडे याच्या शेळ्या फस्त केल्या या बाबत वानविभाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की घटना घडताच तात्काळ वानविभाच्या कार्यालयात संपर्क करून अर्ज देणे गरजेचा आहे. त्यानुसार पंचनामा करून कारवाई करता येते व संबंधित शेतकऱ्यांना शाशनाच्या वतीने मिळणाऱ्या  नुकसानभरपाई बाबत पाठपुरावा करणे शक्य होईल असे संबंधित अधिकाऱ्य़ांनी सिंगितले.

Web Title: many goats killed in a Khed taluka Wolf assault