विजय वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची गाडी मोर्चोच्या कार्यकर्त्यांनी अडविली

पुणे : सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवावी आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांची यांच्या राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची गाडी अडवून घेराव घातला. " या प्रकरणात आपण लक्ष घालू' असे आश्‍वासन थोरात यांनी यावेळी मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांना दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहर कॉंग्रेसच्या वतीने आज टिळक चौकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महसूल मंत्री थोरात हे देखील उपस्थित होते. आंदोलन संपल्यानंतर थोरात गाडी बसून निघाले असताना मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, बाळासाहेब अमराळे, अमर पवार, राकेश भिलारे मीना जाधव, दीपाली पाडळे, विनय ढेरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून घेराव घातला. 
-----------
'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
राज्यात 58 मोर्चे आणि 42 मराठा बांधव शहीद झाल्यानंतर आरक्षण व सारथी संस्था स्थापन झाली. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सारथीच्या स्वायत्ततेबाबतचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत छत्रपती संभाजी राजे यांनी सर्वांशी चर्चा करून देखील सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली. त्यामुळे ती पूर्वी प्रमाणेच अबाधित ठेवावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha demands resignation of Vijay Vadettiwar