Ramdas Athawale: ‘ओबीसी’मधून मिळालेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही; रामदास आठवलेंनी स्पष्ट सांगितलं

Ramdas Athawale
Ramdas Athawale

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु ‘ओबीसी’च्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी मांडली. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी अपापसातील वाद मिटवावा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

पुण्यात आले असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, मंदार जोशी, वीरेन साठे आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असे सांगून आठवले म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छगन भुजबळ देखील आग्रही आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे योग्य असे काम चालू आहे. जातीयवाद समाजातून संपला पाहिजे. जातीनिहाय जनगणना केली पाहिजे आणि त्यातून लोकसंख्येनुसार प्रत्येक जातीला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ‘ओबीसी’मधून मिळालेले आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही.’’

Ramdas Athawale
World Cup Final: कांगारूंनी सामन्यावर पकड निर्माण करताच ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मैदानात दाखल

भीमा कोरेगाव येथे भव्य स्मारक व्हावे, यासाठी आमचा समाज अग्रेसर राहणार आहे, असे सांगून आठवले म्हणाले, ‘‘पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर आमचे सरकार आले, तर भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. नवीन संसद भवनला दिल्ली येथे संविधान भवन असे नाव देणार आहोत.’’ (Latest Marathi News)

‘...तर राऊतांना पासपोर्ट देऊ’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता, रामदास आठवले म्हणाले, ‘‘राऊत यांचा पासपोर्ट हरवला असेल, तर आम्ही त्यांना देऊ. २०१४ नंतर त्यांना बाहेर जावे लागणार आहे. त्यांचा पासपोर्ट आम्ही जप्त करणार नाही.’’

Ramdas Athawale
Steve Smith DRS : स्मिथ बाद नव्हता? ट्रविस हेडमुळं ऑस्ट्रेलिया आली अडचणीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com