Maratha Reservation : राजकीय पक्षांनी आजपर्यंत मराठा समाजाची दिशाभूल केली ; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया !

Maratha Reservation : राजकीय पक्षांनी आजपर्यंत मराठा समाजाची दिशाभूल  केली ; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया !

सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत मराठा समाजाची दिशाभूल केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधांतरी ठेवून त्याचा भांडवल म्हणून उपयोग केला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील आंदोलनात मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

Maratha Reservation : राजकीय पक्षांनी आजपर्यंत मराठा समाजाची दिशाभूल  केली ; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया !
Maratha Reservation : मराठ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात! सोमवारी दिली ठाणे बंदची हाक

जालना येथील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा व लाठीमाराचा निषेध म्हणून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगड व पानशेत परिसरातील गावांमध्ये यावेळी कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

खानापूर येथील विठ्ठल मंदिर ते मुख्य रस्त्यावरील बस स्थानकापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डोणजे ते पानशेत पर्यंतच्या सर्व गावांतील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते.

Maratha Reservation : राजकीय पक्षांनी आजपर्यंत मराठा समाजाची दिशाभूल  केली ; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया !
Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन आणखी तीव्र करणार! सरकारशी चर्चा फिस्कटली, आजपासून औषध-पाणी बंद

विठ्ठल मंदिरासमोर मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी पदाधिकारी व ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या मनोगतांमधून सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. मराठा समाजाला जाणीवपूर्वक आरक्षणापासून दूर ठेवण्यात आले असून कोर्टाच्या नावाखाली दिशाभूल करण्यात येत आहे. आता आरक्षण मिळायलाच हवे, आता मिळाले नाही तर पून्हा कधीच मिळणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते.

विठ्ठल मंदिर ते बस स्थानकापर्यंत पायी मोर्चा काढून आंदोलकांनी पुणे-पानशेत रस्त्यावर काही वेळ ठिय्या मांडला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलनासाठी हवेली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता. सर्व आंदोलकांच्या वतीने हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांना निवेदन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com